बारामती हादरलं..छेडछाड असह्य झाली अन अल्पवयीन मुलीने त्यानंतर..

शेअर करा

महिला शेळ्या चारत असताना

महाराष्ट्रात एक खळबळ जनक असा प्रकार पुणे जिल्ह्यातील बारामती येथील माळेगाव परिसरात समोर आलेला असून सतत होत असलेली छेडछाड आणि बदनामी याला वैतागून एका 17 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. बारामती तालुक्यातील शिवपुरी सोनकसवाडी येथे 28 तारखेला ही घटना घडलेली आहे. माळेगाव पोलिसात चार जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , तुषार लक्ष्मण महानवर , लक्ष्मण बाबा महानवर , सिंधुबाई लक्ष्मण महानवर , नवनाथ दादा महानवर ( सर्वजण राहणार शिवपुरी सोनकस वाडी तालुका बारामती ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून पीडित मुलीच्या आजोबांनी या संदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे.

आरोपी तुषार महानवर हा फिर्यादी यांच्या नातीला सप्टेंबर महिन्यापासून 27 नोव्हेंबरपर्यंत सतत छेडछाड करत असायचा . 27 तारखेला दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरात आरोपी आला आणि त्याने नातीचा विनयभंग केला. सर्व आरोपींनी तुषारला समजावून सांगण्याऐवजी मुलीचीच बदनामी करण्याची देखील धमकी दिलेली होती.

आरोपीकडून सतत छेडछाड आणि बदनामी होत असल्याकारणाने पीडित मुलीने घरात पत्र्याच्या खोलीमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटलेले असून पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे.


शेअर करा