‘ तडजोड ‘ झाली अन सापळा पण लागला , रजपूत साहेब रंगेहाथ ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्रात सर्वाधिक लाचखोरीचे प्रमाण महसूल आणि पोलीस विभागात असल्याचे वेळोवेळी दिसून येत असून एका गुन्ह्याच्या कामात मदत करण्याप्रकरणी एक लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक असलेल्या एका व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , विक्रम प्रतापसिंग रजपूत असे आरोपी व्यक्तीचे नाव असून एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा तपास रजपूत यांच्याकडे होता . तपासाच्या कामात तुम्हाला मदत करू , तक्रारदाराच्या मित्रावर यापूर्वी असलेल्या गुन्ह्यासंदर्भात प्रतिबंधक कारवाई करणार नाही यासाठी पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावाने दोन लाख रुपयांची लाच मागितली होती.

तडजोड करण्यात आल्यानंतर अखेर एक लाख रुपये लाच स्वीकारण्याची तयारी पोलीस उपनिरीक्षक रजपूत यांनी दाखवली आणि ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे , अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे, हवालदार शिरीष कुमार सोनवणे , पोलीस नाईक श्रीराम घुगे , अतुल घाडगे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.


शेअर करा