पुण्यात अग्नितांडव..कंपनीत स्फोट झाल्याने सहा महिलांचा होरपळून मृत्यू तर तब्बल

शेअर करा

पुण्यातून एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना चिखलीजवळ तळवडे येथे समोर आलेली असून शोभेच्या मेणबत्त्या बनवणाऱ्या एका कारखान्याला आग लागून तब्बल सहा महिलांचा होरपळून मृत्यू झालेला आहे . सदर घटनेमध्ये नऊ महिला आणि एक पुरुष हे देखील जखमी झालेले असून ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , शुक्रवारी आठ तारखेला दुपारी तीनच्या सुमारास तळवडे येथील ज्योतिबा नगर परिसरात ही दुर्घटना घडलेली असून अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग विझवली आणि जखमी तसेच मयत महिलांना बाहेर काढले . महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे यांनी देखील घटनास्थळी तात्काळ धाव घेतली होती.

शोभेच्या मेणबत्त्या बनवणाऱ्या कंपनीमध्ये ज्वलनशील पदार्थाचा अचानकपणे स्फोट झाला आणि तब्बल सहा महिलांनी प्राण गमावले . स्फोटानंतर लागलेल्या आगीचा फटका इतरही अनेक कामगारांना बसला . आग इतकी भयानक होती की मयत व्यक्तींची ओळख पटवणे देखील अवघड झालेले होते . राणा इंजिनिअरिंगच्या कंपाऊंडमध्ये एका छोट्याशा शेडमध्ये हा कारखाना होता . परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून मोठ्या प्रमाणात शेड मारण्यात आलेली असल्याकारणाने आग लागल्यानंतर इतर कामगारांना देखील बाहेर पडणे अवघड झाले होते.


शेअर करा