..म्हणून विवाहित महिला चक्क साप घेऊन घरी आली अन रात्री , कोर्टही हैराण

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच अशीच एक घटना राजस्थान येथील जयपूर इथे उघडकीस आली आहे . एका सुनेनं चक्क आपल्या सापाचा वापर करत सासूची निर्घृण हत्या केली आहे. सासूची हत्या करण्यासाठी आरोपी महिलेनं चक्क एका विषारी नागाचा वापर केला आणि हत्या झाल्यावर नाग चावला असा बनाव रचला मात्र तिचा हा बनाव फार काळ टिकला नाही . आरोपी महिलेला व विषारी साप देणाऱ्या गारुड्याला देखील पोलिसानी ताब्यात घेतलं आहे.

उपलब्ध माहितीनुसार , आरोपी महिलेचा विवाह हा भारतीय सैन्य दलातील एका जवानासोबत झाला होता मात्र पती सैन्यात असल्यानं आरोपी महिलेचं अन्य एका तरुणासोबत सूत जुळलं होतं. ती सातत्याने आपल्या प्रियकराशी फोन वर बोलत असायची याचा सासूला संशय आला आणि त्यांच्यात वाद सुरु झाले. सासरा देखील नोकरीच्या निमित्ताने बाहेर असायचे त्यामुळे आरोपी महिलेला तिच्या प्रेमप्रकारात फक्त सासू हाच एकमेव अडथळा होता .

आरोपी महिलेनं प्रियकराच्या आणि त्याच्या मित्रांच्या मदतीनं झुनझुनु जिल्ह्यातून एक विषारी साप मागवला अन 2 जून 2018 सापाला एका बॅगमध्ये ठेवून ही बॅग सासूच्या खोलीत ठेवली. दुसऱ्या दिवशी सासू नाग चावल्याने मरण पावलेली होती. सकाळी सुनेनं सासूचा मृत्यू झाल्याचा कांगावा सुरु केला अन सासूला नजीकच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण तोपर्यंत सासूचा मृत्यू झाला होता.

सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मात्र सुनेचा कॉल तपशील चेक केला असता हळूहळू पोलिसांना यात संशय येऊ लागला. साप कोणता होता इथपासून तर तो कसा आत येऊ शकतो ? असे अनेक पॉईंट तपासात विचारात घेण्यात आले अन शेवटी संशय सुनेवरच येऊन ठेपला. सून व तिचा प्रियकर हे सतत संपर्कात असल्याचं देखील कॉल डिटेलवरून पोलिसांना समजलं. पोलिसांनी विषारी साप पुरवणाऱ्या व्यक्तीला देखील ताब्यात घेत त्याला साक्षीदार बनवल असून सुनेच्या या निर्दयीपणाची परिसरात चांगलीच चर्चा आहे .


शेअर करा