पप्पा मला किडनॅप केलंय , क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवा

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार पालघर जिल्ह्यातील वसई इथे समोर आलेला असून एका वीस वर्षाच्या मुलाने वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःचे अपहरण झाल्याचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे . वसईतील फादरवाडी भागात ही घटना समोर आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सात डिसेंबर रोजी मुलगा घराबाहेर गेला आणि तो आला नाही म्हणून 8 डिसेंबर रोजी यासंदर्भात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. तक्रारदार व्यक्ती यांनी आपल्याला मुलाचा फोन आला त्यावेळी त्याने आपले तीन जणांनी अपहरण केलेले आहे अशी माहिती दिली आणि तीस हजार रुपयांची खंडणी मागितलेली आहे असे म्हटलेले होते.

तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे खंडणी मिळाली नाही तर तुमच्या मुलाला ठार मारून अशी देखील धमकी आपल्याला दिली आहे असे मुलाने सांगितलेले होते त्यानंतर वडिलांना क्यूआर कोड पाठवण्यात आला त्यावर पेमेंट करायला सांगितले मात्र पोलिसांनी तपास सुरू केला त्यावेळी हा क्यूआर कोड त्याच्याच एका ओळखीच्या व्यक्तीचा निघाला. पोलिसांनी वीस वर्षीय मुलाला ताब्यात घेतलेले असून विक्रमी वेळेत पोलिसांनी मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचल्यानंतर अखेर वडिलांनी सुटकेचा विश्वास टाकला आहे.


शेअर करा