‘ बलात्कार हा बलात्कारच कारण पुरुष.. ‘ , गुजरात हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण 

शेअर करा

गुजरात उच्च न्यायालयाने बलात्कार हा बलात्कारच असतो मग एखाद्या पुरुषाने त्याच्या पत्नीवर बळजबरी केलेली असेल तरीदेखील तो बलात्कार मानला जाईल असे निरीक्षण गुजरात उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी नोंदवलेले आहे. लैंगिक हिंसाचारावर नेहमी मौन बाळगण्यात येते असे ही परिस्थिती बदलण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , एका महिलेच्या नवरा आणि मुलाने तक्रारदार महिलेवर बलात्कार केला आणि पैसे कमावण्यासाठी तिचे विवस्त्र अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ अश्लील संकेतस्थळावर पोस्ट केलेले होते असा आरोपींवर आरोप आहे . पाठलाग करणे , अश्लील वक्तव्य करणे , शारीरिक लगट करणे या गुन्ह्यांना समाजात किरकोळ मानले जाते. महिलेवर बळजबरी करणारा तिचा पती असेल तर तिच्यावरील लैंगिक अत्याचाराला बलात्कार मानले जात नाही मात्र ही मानसिकता बदलण्याची गरज आहे कारण पुरुष हा पुरुष असतो आणि बलात्कार हा बलात्कार असतो , असे न्यायमूर्ती दिवेश जोशी यांनी म्हटलेले आहे. 

न्यायमूर्ती पुढे म्हणाले की , ‘ महिलांवर अत्याचार करणारे अनेकदा त्यांच्या कुटुंबातील परिचयातील असतात मात्र महिलांवर असलेल्या दहशतीमुळे लैंगिक अत्याचाराची प्रकरणे समोर येत नाही. देशात महिलांवरील अत्याचाराची नोंदवली जाणारी प्रकरणे आणि प्रत्यक्षात असलेली संख्या यात मोठी तफावत आहे त्यामुळे या अत्याचारांबाबत बाळगले जाणारे मौन तोडण्याची देखील गरज आहे. अमेरिका , ऑस्ट्रेलिया , न्यूझीलंड , कॅनडा , इजराइल ,फ्रान्स स्वीडन ,डेन्मार्क ,नॉर्वे यासारख्या अनेक देशात वैवाहिक बलात्कार हा गुन्हा असल्याचे मानले गेलेले आहे असे देखील न्यायालयाने पुढे म्हटले आहे. 


शेअर करा