भारत पाकिस्तानमध्ये एकच सीमा , तिचे नाव ‘ सीमा हैदर ‘ 

शेअर करा

पाकिस्तानमधूनआपल्या प्रियकरासाठी भारतात आलेली सीमा हैदर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असून माध्यमातील या चर्चांची अल्पवयीन मुलांमध्ये देखील जोरदार चर्चा होत आहे. असेच एक प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याने  राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये दिलेल्या उत्तराने शिक्षकांच्या देखील भुया उंचावलेल्या आहेत. 

राजस्थानच्या ढोलपूर मधील हा प्रकार असून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याने राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणती सीमा आहे असा प्रश्न विचारलेला होता त्यावर त्याने उत्तर देताना ‘ भारत आणि पाकिस्तान मध्ये एकच सीमा आहे तिचे नाव सीमा हैदर असून तिची उंची पाच फूट सहा इंच आहे. तिच्यावरून दोन्ही देशात प्रचंड तणाव झालेला असून दोन युद्धे देखील झालेले आहेत ‘ असे देखील त्याने उत्तरात लिहलेले आहे . 

विद्यार्थ्यांचे हे उत्तर वाचल्यानंतर शिक्षकांनी अर्थातच कपाळाला हात लावला आणि त्याला शून्य मार्क दिले. ही उत्तरपत्रिका सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले असून अनेक जणांनी ती खोटी किंवा गंमत म्हणून काहीतरी पोस्ट करायचे म्हणून केलेली असल्याचे देखील म्हटलेले आहे. काही जणांनी मात्र इतके सुंदर उत्तर दिल्याबद्दल या विद्यार्थ्याला आणखी मार्क द्यायला पाहिजे होते असे देखील म्हटलेले आहे . 


शेअर करा