जेवणात मटनाची ‘ नळी ‘ नाही म्हणून मोडलं लग्न , बोली ठरली होती की.. 

शेअर करा

देशात एक विचित्र असे प्रकरण सध्या हैदराबाद मध्ये समोर आलेले असून वऱ्हाडी मंडळीला वाढण्यात आलेल्या जेवणामध्ये मटणाची नळी नसल्यामुळे भांडण झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. नवरी मुलगी ही निजामाबाद येथील राहणारी असून मुलगा जगतियाल येथील रहिवासी आहे. मुलीच्या घरीच नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा झालेला होता आणि वधू पक्षाकडील लोकांनी पाहुण्यांसाठी मांसाहारी बेत ठेवलेला होता मात्र त्यात जेवणात मटणाची नळी नसल्याची तक्रार वर पक्षाकडील लोकांनी केलेली होती. 

साखरपुड्यापूर्वी झालेल्या बोलणीमध्ये जेवणाच्या पदार्थांमध्ये मटणाची नळी राहील असे सांगण्यात आलेले होते मात्र प्रत्यक्षात जेव्हा वर मंडळी जेवायला बसले त्यावेळी जेवणामध्ये मटणाची नळी आढळून आली नाही त्यामुळे वाद झाल्यानंतर अखेर पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांना वाद मिटवण्याचा सल्ला दिला मात्र मोठ्या प्रमाणात असलेले वऱ्हाडी मंडळी पोलिसांचे देखील ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. 

जर तुम्हाला जेवणात मटणाची नळी द्यायचीच नव्हती तर साखरपुड्याच्या आधी आम्हाला सांगणे गरजेचे होते असे म्हणत वर मंडळीकडील व्यक्तींनी चांगलाच राडा केला त्यानंतर वर पक्षाने अखेर साखरपुडा अर्ध्यात मोडत आहे आणि लग्न देखील मोडले आहे असे जाहीर केलेले आहे. 


शेअर करा