पुण्याच्या कोयता गँगशी एक महिला हवालदाराचा पंगा , भर रस्त्यात पकडलं अन.. 

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून कोयता गँगच्या नावाखाली शहरात धुमाकूळ सुरू आहे मात्र नागरीक दहशतीमुळे बोलायला तयार नाहीत. वडगाव शेरी परिसरात अशाच प्रकारे धुमाकूळ सुरू असताना पोलीस ठाण्यातील ड्युटी संपवून महिला हवालदार यांनी या गुन्हेगारांशी पंगा घेत रस्त्यावर उतरून आपले काम सुरू केले आणि पोलीस येईपर्यंत गुंडांना पकडून ठेवले होते. 

उपलब्ध माहितीनुसार , सीमा वळवी असे या जिगरबाज पोलीस हवालदार महिलेचे नाव असून त्यांनी स्वतःच्या जीवाला धोका पत्करत नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून गुंडांशी चार हात केलेले आहेत . वडगाव शेरी येथील दिगंबर नगर परिसरात रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास वाद सुरू होता त्यावेळी चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवलदार सीमा वळवी ड्युटी संपून घरी जात होत्या. 

गर्दी आणि आरडाओरडा पाहिल्यानंतर सीमा वळवी तिथे थांबल्या आणि त्यांना पाहताच काही आरोपींनी पलायन सुरू केले मात्र एका आरोपीने कोयता काढला आणि दुसऱ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सीमा वळवी यांनी आरोपींना नंतर पकडता यावे म्हणून मोबाईलद्वारे काही सुरुवातीला चित्रण केले मात्र एकट्या लढणाऱ्या सीमा वळवी यांच्या मदतीला कोणी नागरिक आले नाहीत . 

एका आरोपीने कोयत्याने वार केले म्हणून दोन जण जखमी झाले त्यानंतर वळवी यांनी शूटिंग थांबवत एका आरोपीला पकडले आणि तात्काळ नियंत्रण कक्षाला फोन केला. चंदन नगर पोलीस अवघ्या काही मिनिटात तिथे पोहोचले आणि आरोपींना अटक केली. सीमा वळवी यांनी ज्या पद्धतीने हा सर्व विषय हाताळला त्यामुळे त्यांचे परिसरात जोरदार कौतुक केले जात आहे सोबतच सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या पुणेकरांची तटस्थ भूमिका देखील दुर्दैवी होती. 


शेअर करा