थंडीचा महिना आलाय बायको द्या , तरुणाचे चक्क पोलिसांकडे गाऱ्हाणे 

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका तरुणाची जोरदार चर्चा असून या तरुणाने पोलीस ठाण्यात पोहोचत जी काही मागणी केली ती अत्यंत जगावेगळी अशी होती . सदर तरुण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि , ‘ आपण खूप दुःखी आहोत छान जेवण बनवणारी पत्नी आपल्याला हवी आहे . थंडीचा हंगाम सुरू झालेला आहे त्यामुळे एकाकीपणा सहन होत नाही ‘ असे पोलीस स्टेशनला जाऊन त्याने म्हटलेले आहे. 

उत्तर प्रदेशातील बिनापुर गावातील हा प्रकार असून निरज यादव असे या व्यक्तीचे नाव आहे . नीरज याचे वय 40 वर्ष असून त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याने ही मागणी केली . गेल्या काही वर्षांपासून त्याचे लग्न होत नसल्याने तो हतबल झालेला आहे. मानसिकरित्या तो खचून गेला आणि त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आता थंडीचा हंगाम सुरू झालेला आहे त्यामुळे मला पत्नी बायको आणून द्या असे पोलिसांना म्हटलेले आहे. 

नीरज याने आपल्या तक्रारीत पोलिसांना बायको शोधून देण्याची विनंती केलेली आहे सोबतच सध्या थंडीचा हंगाम सुरू झालेला आहे त्यामुळे जेवणाच्या देखील आपल्या खूप समस्या निर्माण होतात असे देखील त्याने तक्रारीत म्हटलेले होते.  त्याची तक्रार ऐकल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्या घरच्यांना फोन केला आणि घरच्यांनी येऊन त्याची मानसिक स्थिती ठीक नाही म्हणून तो असे करतो असे म्हणत त्याला घरी घेऊन गेले . 


शेअर करा