डान्स बारची उधारी ‘ बाकी ‘ राहिली , बार कर्मचाऱ्यांनी क्रूरतेची मर्यादा ओलांडली

शेअर करा

महाराष्ट्रात एक अजब प्रकार मुंबईतील मिरा रोड परिसरात समोर आलेला असून सिल्वर पार्क इथे येणाऱ्या ग्राहकाचे पैसे बाकी होते म्हणून बारच्या कर्मचाऱ्यांनी त्याला त्याच्या घराबाहेर बोलावले आणि त्यानंतर त्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. मीरा रोड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि चार जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. 

नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर सिल्वर पार्क येथे मॅडोना आर्केस्ट्रा कम डान्सबार येथील एका ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे .सदर आर्केस्ट्रा बार हा एका सदनिकेचे रूपांतर करून बनवण्यात आल्याची तक्रार सोसायटीने अनेकदा महापालिका आणि पोलिसांकडे देखील केलेली आहे मात्र त्यांच्यावर कारवाई न करता पोलीस बारमालकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप सोसायटीतील इतर सभासदांकडून करण्यात आलेला आहे. बारवाल्यांची दहशत वाढत असल्याने पोलीस त्यावर अंकुश ठेवू शकत नाहीत असे दिसून येत आहे. 

मिरा रोड येथील या बारमध्ये येणाऱ्या नरेंद्र उपाध्याय नावाच्या व्यक्तीचे सुमारे 60 हजार रुपये उधारी देणे बाकी होते . मॅडोना बारमधील कर्मचारी वाहिद गणेश पाटील , कमलेश मोहसीन व इतर पाच ते सहा व्यक्तींनी फिर्यादी व्यक्ती यांना घराबाहेर येण्यास सांगितले आणि बाहेर आल्यानंतर त्यांना बळजबरीने एका रिक्षात बसून किडनॅप करण्यात आले . त्यांना मॅडोना आर्केस्ट्रा बार येथे आणण्यात आले आणि त्यानंतर बारमधील एका खोलीत डांबून ठेवले आणि त्यांना मारहाण करण्यात आली. तक्रारदार व्यक्ती यांचा मोबाईल फोडून देखील त्यांनी नुकसान केलेले असून याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याची माहिती आहे. 


शेअर करा