‘ तुम्हाला मी रिलॅक्स करते ‘ , वीस वर्षीय तरुणीचा आजोबांच्या खोलीत धुमाकूळ 

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना लैंगिक सुखाच्या जाळ्यात अडकवत त्यानंतर त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने खंडणी वसूल करण्याचे प्रकार सुरू झालेले असून असाच एक प्रकार मुंबईतील खारमध्ये समोर आलेला आहे. एका वृद्ध व्यक्तीकडे केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीने या व्यक्तीचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि ते समाज माध्यमांवर व्हायरल न करण्याच्या बदल्यात सव्वा दोन लाख रुपयांची खंडणी मागितली . खार पोलिसात या प्रकरणी एका महिलेसोबत चार जणांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी व्यक्ती यांचे वय 63 वर्ष असून त्यांनी केअरटेकर सेवा देणाऱ्या संस्थेचा जस्ट डायल वर शोध सुरू केलेला होता. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या संस्थेशी संपर्क साधला आणि 29 डिसेंबर रोजी नीतू भारद्वाज नावाची एक वीस वर्षीय तरुणी त्यांच्या घरी आली.  तिची मुलाखत घेतली त्यावेळी तिला औषधांची तसेच वैद्यकीय साहित्य यांची कुठलीच माहिती नव्हती हे पाहून वृद्ध व्यक्ती यांनी तिला नकार दिला मात्र तिने कामाची खूप गरज आहे असे सांगत वृद्ध व्यक्ती यांना भुलवत कामाच्या ठिकाणी ती रुजू झाली. 

ज्या दिवशी तिला कामावर ठेवले त्याच दिवशी रात्री तिने वृद्ध व्यक्ती यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तुम्हाला मी रिलॅक्स करते असे सांगत त्यांच्या बेडरूममध्ये आली आणि त्यांच्यासोबत गैरप्रकार केला . दुसऱ्या दिवशी सकाळी वृद्ध व्यक्ती यांनी तिला विचारले आणि एक दिवसाचे वेतन देऊन तिला कामावरून काढून टाकले मात्र तिने त्यानंतर वृद्ध व्यक्ती यांना कॉल करून रात्रीचे तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत तीस हजार रुपयांची मागणी केली. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर तिचा सहकारी असलेला अनिल चव्हाण याने देखील दोन साथीदारांच्या मदतीने वृद्ध व्यक्ती यांना धमकावणे सुरू केले. 

हतबल झालेले वृद्ध व्यक्ती यांनी त्यानंतर तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली तर दुसरीकडे आरोपींकडून खंडणीसाठी धमकावणे सुरू होते. वृद्ध व्यक्ती यांनी त्यांना 50 हजार रुपये देतो असे सांगून घरी बोलून घेतले त्यावेळी अनिल चव्हाण हा त्याचे साथीदार किरण नायर आणि राजेश केवट यांच्यासोबत तिथे पोहोचले. पोलिसांनी तीनही जणांना ताब्यात घेतले असून आरोपी तरुणी हिलादेखील तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. 


शेअर करा