उंदराने तरुणीचा ‘ ओठ ‘ चावला तरुणीने त्यानंतर जे काही केले ते.. 

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका महिलेची जोरदार चर्चा सुरू असून चीनच्या एका प्रांतातील ही घटना आहे . एका उंदराने तरुणीचा चावा घेतला म्हणून संतप्त झालेल्या तरुणीने उंदराला चावले अन या चावाचावीत उंदराचा अखेर मृत्यू झालेला आहे. 

चीनच्या एका विद्यापीठातील ही घटना असून वस्तीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला एका उंदराचा भयंकर त्रास जाणवत होता.  तिने पिंजरे लावून पाहिले औषधे टाकली मात्र चलाख झालेले उंदीर तिच्या हाती येत नव्हते अखेर एक उंदीर विद्यार्थिनीच्या हाती सापडला आणि त्यानंतर त्याने तरुणीच्या खालच्या ओठावर दंश केला. रक्तबंबाळ झालेल्या तरुणीने त्यानंतर तात्काळ त्याचाच चावा घेतला आणि त्यानंतर मनुष्य प्राण्याचा चावा जिव्हारी लागल्यानंतर उंदराने ‘ ची ची ‘ करत अखेर प्राण सोडले. 

पुढे जे घडले ते त्याहून अधिक धक्कादायक होते संतप्त झालेल्या तरुणीने त्याला खायला सुरू केले मात्र हा प्रकार इतर विद्यार्थिनींनी पाहिला आणि त्यानंतर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले . सोशल मीडियावर सध्या या तरुणीची जोरदार चर्चा सुरू असून उंदराला खाण्याचे किंवा चावण्याचे जीव घेणे साहस कुणी करू नये असे देखील आवाहन त्यानंतर विद्यापीठाकडून करण्यात आलेले आहे. 


शेअर करा