‘ काढ गुटख्याची पुडी ‘ इतकंच म्हणाला , एकाचा झाला खून

शेअर करा

महाराष्ट्रात किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून गुटख्याची पुडी मागितल्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये शाब्दिक शिवीगाळ झाली आणि त्यानंतर एकाने दुसऱ्याचा चाकूने भोसकून खून केलेला आहे. जालना जिल्ह्यातील पीर पिंपळगाव येथील हे प्रकरण असून सहा तारखेला संध्याकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , दिलीप हरिभाऊ कोल्हे ( वय 29 ) असे मयत तरुणाचे नाव  आहे . जालना भोकरदन रोडवरील पीर पिंपळगाव शिवारात मयत दिलीप हरिभाऊ कोल्हे आणि त्यांचे काही मित्र दारू पार्टी करत होते त्यावेळी एकाने गुटख्याची पुडी मागितली म्हणून त्यांच्यात शाब्दिक वादावादी सुरू झाली. एका व्यक्तीने त्यानंतर त्याच्या खिशातील चाकूने दिलीप यांना भोसकले त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

दिलीप यांचे वडील हरिभाऊ यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले होते मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत , पोलीस उपनिरीक्षक पाटील उपनिरीक्षक सानप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती . चंदनझिरा पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आलेली आहेत. 


शेअर करा