फाशीचा प्रयत्न फसला पण तरीही झाला मृत्यू , झालं असं की.. 

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळ जनक असे प्रकरण नागपूर जिल्ह्यात समोर आलेले असून वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर आंबेडकर नगर रामजीत चौक इथे फाशी घेण्याचा एका व्यक्तीचा प्रयत्न फसला मात्र याच दरम्यान पायाखाली ठेवलेला डबा पडला आणि सदर व्यक्ती भिंतीवर आदळला . त्यात दुखापत झाल्याने अखेर त्यांचा मृत्यू झालेला आहे . मयत व्यक्तीचे वय 42 वर्ष असल्याची माहिती असून सहा जानेवारी रोजी हा प्रकार घडलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , उमेश मोहनलाल पटले असे मय त व्यक्तीचे नाव असून त्यांची पत्नी आणि मुले वाढदिवसानिमित्त नागपूरला गेलेली होती त्यावेळी उमेश यांनी फाशी घेण्याचा प्रयत्न केला.  दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास तयार केला आणि खुर्चीवर डबा ठेवून त्यावर ते चढले मात्र डबा घसरला आणि त्यानंतर ते भिंतीवर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली . बाजूला कुणीच नसल्याकारणाने ते कित्येक तास तसेच पडून होते. 

रात्री त्यांची पत्नी आणि मुले घरी आली त्यावेळी त्यांना हा प्रकार दिसला आणि त्यांनी आरडाओरडा करत तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवले मात्र खाजगी रुग्णालयाने त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आणि नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता /. गेल्या अनेक दिवसांपासून काम नसल्याकारणाने ते चिंतेत असायचे त्यातून त्यांनी हा प्रकार केल्याची चर्चा आहे. 


शेअर करा