भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या अल्पवयीन मुलीला नेलं अन.. 

शेअर करा

देशात वासनांध लोकांच्या नजरेत आता भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या देखील अल्पवयीन मुली निशाण्यावर असून असाच एक संतापजनक प्रकार जळगाव येथे समोर आलेला आहे.  एका अल्पवयीन गतिमंद मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रकार करण्यात आलेला असून याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली आहे . न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , जळगाव शहरातील सुभाष चौकातील मंदिराजवळ तेरा वर्षांची गतिमंद अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत भीक मागत असायची त्यावेळी संशयित आरोपी असलेला वसीम खान कय्युम खान हा या मुलीला दुचाकीवरून एका शेतात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला . पीडित मुलीने नातेवाईकांना हा प्रकार सांगितला त्यावेळी त्यांनी शनी पेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली . मुलगी गायब झाल्याने सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता मात्र आरोपी सापडल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे देखील समोर आलेले आहे. 

मुलीवर अत्याचार झाल्याची बाब उघड होताच आरोपीच्या विरोधात बलात्कार पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असून गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तात्काळ अवघ्या काही तासांच्या आत आरोपी वसीम खान कयूम खान याला अटक केलेली आहे.  न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . सरकारी पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आर टी सोनवणे यांनी फिर्यादी मुलीची बाजू न्यायालयासमोर मांडलेली होती.


शेअर करा