‘ तिकडे काम आहे माझ्यासोबत चला ‘ , सणसवाडीत दोघींना नेलं अन.. 

शेअर करा

पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार शिरूर तालुक्यातील सणसवाडी इथे समोर आलेला असून दोन महिला काम शोधण्यासाठी आलेल्या असताना एका व्यक्तीने ‘ तिकडे काम आहे माझ्यासोबत चला ‘ असे म्हणत एका गावामध्ये घेऊन जात त्यांचा हात पकडून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केलेले आहे. 

फिर्यादी महिला यांनी त्यानंतर तात्काळ शिक्रापूर पोलीस स्टेशन इथे फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यानंतर साईनाथ आनंदराव टोकलवाड ( वय 35 वर्ष राहणार सणसवाडी तालुका शिरूर ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा