पप्पा मला तो खूप आवडतो , वडिलांनी थांबण्याचा सल्ला दिला पण

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण समोर आलेले असून प्रेमसंबंध असलेल्या तरुणासोबत लग्न करून देण्याची मागणी अल्पवयीन तरुणीने केलेली होती मात्र वडिलांनी नकार दिला आणि त्यानंतर तिने प्रियकरासोबत पलायन केले. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी त्यानंतर पोलिसात तक्रार दिली होती . जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील या तरुणाला त्यानंतर अटक करण्यात आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , लक्ष्मण आण्णा मोरे ( वय 19 राहणार तामसवाडी तालुका चाळीसगाव ) असे आरोपी तरुणाचे नाव असून मेहुनबारे पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे . त्याने चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध निर्माण केले आणि त्यानंतर ही मुलगी त्याच्या सोबत लग्नाचा तगादा वडिलांकडे करत होती. 

आपली मुलगी अल्पवयीन असल्याकारणाने वडिलांनी तिला काही काळ थांबण्याचा सल्ला दिला मात्र त्यानंतर तिने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 28 नोव्हेंबर 2023 रोजी ती नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे पळून गेलेली होती.  एका शेतात मजूर म्हणून ते काम करत असायचे याच दरम्यान आरोपीने तिच्यावर अनेकदा अत्याचार केला . मेहुनबारे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले असून आरोपीच्या विरोधात बलात्कार पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . 


शेअर करा