रिव्हॉल्व्हरच्या धाकावर तरुणीची पार्टीत काढली छेड , दोन जण ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मुंबईतील अंधेरी इथे एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीत रिवाल्वरचा धाक दाखवत मुलींची छेड काढणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . गुन्हे शाखेने आरोपींकडून झिरो पॉईंट 32 बोरचे रिवाल्वर देखील जप्त केलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , समद रईस खान ( वय 32 ) आणि मोहम्मद आसिफ अब्दुल रशीद खान ( वय 56 ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून सात जानेवारी रोजी पहाटे अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडलेला होता . आरोपींनी रिवाल्वर काढून धाक दाखवत पार्टीत सहभागी झालेल्या एका मुलीची छेड काढण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  पीडित मुलीने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 

अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचे तरुणीने फिर्यादीमध्ये म्हटलेले होते त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून यातील आरोपींची ओळख पटवली आणि त्यानंतर दोन्ही जणांना अटक करण्यात आलेले आहे . आंबोली पोलिसांच्या त्यांना हवाली करण्यात आलेले असून पुढील तपास पोलीस उपयुक्त राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 


शेअर करा