अल्पवयीन मुलीला दिवस गेल्यावर आईचा ‘ कारनामा ‘ समोर , स्वतःच पुढाकार घेत.. 

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळ जनक असा प्रकार समोर आलेला असून मुंबईतील विद्याविहार येथे राहणाऱ्या एका सतरा वर्षांच्या मुलीवर दोन जणांनी बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे.  धक्कादायक बाब म्हणजे यात पीडित मुलीला दिवस गेलेले असून त्यानंतर तिच्या आईने तिचा गर्भपात देखील केला . बालसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून टिळक नगर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , पीडित मुलीचे वय सतरा वर्ष असून ती मे 2023 पासून डिसेंबर 2023 पर्यंत या दोन तरुणांच्या संपर्कात होती . सदर प्रकरणात मुख्य आरोपी संतोष लुगडे याने सुरुवातीला पीडित मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर ती गर्भवती राहिली . संतोष लुगडे याने पीडित मुलीच्या आईशी संगणमत करून चेंबूर येथे जाऊन तिचा गर्भपात करून घेतला आणि त्यानंतर दुसरा आरोपी ओंकार याने देखील पीडित मुलीवर दोन वेळा बलात्कार केला. 

धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या मुलीवर बलात्कार होत असताना जन्म देणारी आई देखील आरोपींची साथ देत होती . आईने वास्तविक मुलीची बाजू घेणे आणि तिच्यासाठी लढणे भाग होते मात्र तिने आरोपींची साथ दिली आणि त्यांना मदतही केली. जिल्हा बाल समिती पर्यंत हे प्रकरण गेले आणि त्यानंतर तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा