किरण गोसावी की सचिन पाटील ? पुणे पोलीस म्हणतात की …

शेअर करा

मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणात एनसीबीचा पंच किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. किरण गोसावी याच्यावर फसवणुकीचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी किरण गोसावी याला पहाटे एका लॉजमधून अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत त्याने आत्मसमर्पण केले नाही तर त्याला अटक केली असल्याचा खुलासा केला आहे.

पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पहाटेच्या सुमारास कात्रजमधील एका लॉजमधून किरण गोसावी याला अटक करण्यात आली आहे. त्याने आत्मसमर्पण केले नसून अटक करण्यात आली आहे. नोकरीचं आमिष दाखवत त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. गोसावीला कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्याने आणकी काही नागरिकांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर येत आहे.

किरण गोसावी हा बऱ्याच ठिकाणी 10 दिवसांपासून तो फिरत होता. यामध्ये लखनऊ, फतेहपूर, तेलंगणा, जबलपूर, जळगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणांचा समावेश आहे. किरण गोसावी पळत होता तेव्हा तो सचिन पाटील या खोट्या नावाने सर्वत्र जात होता आणि सचिन पाटील या नावाने हॉटेलमध्ये राहत होता. आपण स्टॉप क्राईम एन्जीओचा प्रतिनिधी असल्याचंही तो सांगत आहे .

आतापर्यंत एनसीबी किंवा मुंबई पोलिसांनी किरण गोसावीच्या कस्टडीची मागणी केलेली नाहीये. जर तशी मागणी केली तर आम्ही त्याचा ताबा देण्याबाबत विचार करू, असंही पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. पुण्याच्या आयुक्तांनी ‘ ज्या-ज्या नागरिकांची फसवणूक किरण गोसावीने केली आहे त्यांनी पुढे यावे आम्ही गुन्हे दाखल करू ‘ असे आवाहन केले आहे .


शेअर करा