समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचा आणखी एक ‘ धक्कादायक ‘ खुलासा

समीर वानखेडे यांनी खोटी कागदपत्रं दाखवत नोकरी मिळवली असल्याचा आरोप राष्ट्र्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे आणि त्यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो आणि निकाहनामा समोर आणत ते मुस्लीम असल्याचंही म्हटलं आहे. समीर वानखेडे यांच्या धर्मासंबंधी चर्चा सुरु झाली असून आता त्यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांनीही देखील काही खुलासे केले आहेत. एबीपी माझाशी ते बोलत होते.

समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “हे लव्ह मॅरेज नसून ठरवून कऱण्यात आलेलं लग्न होतं. आमची कुटुंबं चार-पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होती. ते मुस्लीम असल्याचं माहिती होतं. हिंदू आहेत माहिती असतं तर लग्नच केलं नसतं. आमच्याकडे आले तेव्हाही ते मुस्लीम म्हणूनच आले होते. हिंदू म्हणून कधी आले नव्हते. ते हिंदू असल्याचं आत्ता आम्हाला माध्यमांकडून कळालं . लग्न ठरवलं तेव्हा समीर वानखेडे तेव्हा युपीएससीसाठी अभ्यास करत होते ‘

मुलीचा तलाक झाला असल्याने आम्ही आमचं दु:ख पचवलं होतं. आम्ही कधी कोणाला एक्स्पोज केलं नव्हतं. आम्ही सगळं दु:ख विसरलो होतो. त्यांची आई मुस्लीम पद्धतीने सर्व गोष्टी करत होत्या. झायदा यांच्याशी लग्न झालं तेव्हा समीर वानखेडेंच्या वडिलांनी धर्मांतर करत मुस्लीम धर्म स्वीकारला. मुस्लीम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न झालं नसतं. ते आधीचे कागदपत्रं दाखवत आहेत. लग्नानंतरचे दाखवत नाहीत. झायदा यांच्याशी लग्न झाल्यानंतर ते दाऊद झाले. ते आधी हिंदू होते का ? याबद्दल माहिती नाही. पण लग्न केलं तेव्हा दाऊद मुस्लिमच होते ‘.