अखेर आर्यन खानला 25 दिवसांनी जामीन तर किरण गोसावीबाबत ‘ असा ‘ निर्णय

शेअर करा

क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

आज जामीन मंजूर करण्यात आला असला तरी हे तिघेही आज कारागृहाबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्याबाबत आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी माहिती दिली आहे तर मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खानबी प्रकरणातील एनसीबीचा पंच साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली. किरण गोसावीला न्यायालयात हजर करण्यात आले, त्यावेळी न्यायालयाने त्याला 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. किरण गोसावीवर 2018 मधील एका फसवेगिरी प्रकरणात ही कारवाई झाली आहे.


शेअर करा